पुणे दि १४ : -नगरसेवकांनी महापौर या नात्याने करीत असलेल्या विकास कार्यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोकाभिमुख प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यापुढील काळात देखील हेच आपले प्राधान्य असेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ताताई शैलेश टिळक यांनी केले.मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ नुकतेच रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.तांबडी जोगेश्वरी येथून रॅलीला सुरुवात झाली. श्रीमंत दगडूशेठ गणपती येथून जिलब्या मारुती चौक, शिंदे आळी, काळा हौद, राष्ट्रभूषण चौक, चिंचेची तालीम, साठे कॉलनी, सुभाष नगर येथील अत्रे सभागृह येथे समारोप झाला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘गेल्या अडीच वर्षात महिलांच्या मूलभूत आणि वैद्यकीय समस्यांबाबत मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. तसेच मासिक पाळी संदर्भात जनजागृती करून त्यांनी तिरी नॅपकिन पुरवण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित केली आहे. मुक्ता टिळक यांच्या पुढाकाराने महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी उचलण्यात आलेली ठोस पावले समाजस्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी खूप मोलाची ठरत आहेत. तसेच नागरिकांकडूनही त्याची प्रशंसा केली जात आहे असे डॉ. वनमाला शिंदे यांनी सांगितले.