पुणे,दि १५:-केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण यावरच आपल्या प्रचारात भर देत आहे अशी माहिती भाजप-शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुक्ताताई शैलेश टिळक यांनी दिली.प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी शिवसेनेचे राजेंद्र शिंदे आरपीआयचे मंदार जोशी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस धीरज घाटे नगरसेवक हेमंत रासने आणि कसबा मतदार संघाचे अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे सरचिटणीस प्रमोद कोंढरे प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आणि शिवसेनेचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख विनायक धारणे इत्यादी उपस्थित होते
महिला स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत आपण यापूर्वीच मिशन मोड कार्यक्रम घेतले आहेत. आता दर एक किलोमीटरला महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असं सांगून मुक्त खेळत म्हणाल्या की, वाडे पुनर्विकास, रस्ते रुंदी, वाहतूक सुधारणा आणि मेट्रो स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांच्या माध्यमातून कसबा विधानसभा मतदारसंघाचा आपण चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
कोणत्याही परिसराचा विकास होण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक स्तरावरील सरकार यांच्यामधील समन्वयात इथे महत्त्वाचा ठरतो. स्थानिक स्तरावर महापौर या नात्याने आपण अनेक विकासकामे संपूर्ण शहरभर राबवली आहे. आता या अनुभवाला राज्य सरकारच्या विकासाची दृष्टी असलेल्या धोरणात्मक कार्याची जोड देऊ, असा विश्वास मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला.