पुणे तिळवण तेली समाजाचे कायम दानशूर व्यक्तीमत्व श्री प्रकाश शेठ करडिले यांचा ६१ वा वाढदिवस काल मुकुंद नगर मधील झांबरे पॅलेस येथे दिमाखदार पध्दतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी नगर रोड, कोथरुड, अप्पर सुपर बिबवेवाडी, पुणे शहरातील तेली समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव हजर होते याप्रसंगी श्री प्रकाश शेठ करडिले यांनी सामाजिक बांधिलकी च्या नात्यातून अनेक सामाजिक संस्थांना रोख व वस्तु रुपाने देणग्या दिल्या त्यानुसारच अखिल तेली समाजाचे आरोग्य दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे याठिकाणी चालु असलेल्या विकास कामासाठी र रु ६१,१६१/- ( अक्षरी रुपये एकसष्ठ हजार, एकशे, एकसष्ठ) देणगी संस्थेस दिली ़ यावेळी संस्थेचे मुख्य सचिव अॅड श्री राजेशजी येवले, खजिनदार श्री दत्तात्रय शेलार, उपाध्यक्ष श्री विजयकुमार शिंदे, सौ सुलोचना ताई करडिले, शिक्षण समितीचे सचिव श्री पंडित राव पिंगळे, यावर्षी चे उत्सव अध्यक्ष श्री संतोष शेठ माकुडे, माजी खजिनदार श्री राजेंद्र घाट, कर इ, उपस्थित होते संस्थेच्यावतीने श्री प्रकाश शेठ करडिले, यांचे हार्दिक अभिनंदन व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या