पुणे दि १७ :– भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्हे यांनी दिली.भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम पक्षांच्या कसबा मतदार संघातील उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचारार्थ महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवसेना, भाजप, रिपाईचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले वाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून निघालेल्या या महिला रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्या नी मोठा प्रतिसाद दिला. लोया नगर मार्गे लाल महाल येथे रॅलीची सांगता झाली.यावेळी गोर्हे म्हणाल्या, ‘पुणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवार निवडून येणार याबद्दल शंका नाही. बंडखोरांनी कितीही कांगावा केला तरी जनतेला असते ठाऊक आहे.
टिळक म्हणाल्या,’ महायुतीने केलेली विकास कामे नागरिकांना भावली आहेत. त्यामुळेच महायुतीच्या सर्वच उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.