इंदापूर दि,१७:- तालुका (प्रतिनिधी) बाळासाहेब सुतार इंदापूर तालुक्यातील पाण्याच्या अडचणी तालुक्यातील सिंचन व औद्यगिक वसाहतीत उद्योग आणुन बेरोजगारी दुर करण्यासाठी हर्षवर्धन पाटीलांना निवडुन दिल्यास इंदापूर तालुक्याच्या तळागळातील विकास झाल्याशिवाय गप्प बसणार नाही हर्षवर्धन पाटलाला तुम्ही साथ द्या आणि कमळाच्या चिन्हावर बटन दाबून हर्षवर्धन पाटलाला भरघोस मतांनी विजय करून विधानसभेत पाठवून द्या मी विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आवाहन मुख्यमंत्री द्रेंवेंद्र फडणवीस यांनी केले.
इंदापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
तालुक्यातील सुरू असलेली विकास कामे केंद्र व राज्य सरकारची आहेत. नृसिंहाच्या आर्शिवादाने मी येथे आलो असुन तेथील विकास कामे राज्य सरकार करीत आहे. विकासाच्या इंजिनाला हर्षवर्धन पाटील आमदार झाले तर डबल इंजिन होऊन विकासाचा वेग आणखी वाढेल.इंदापूरच्या विजयामध्ये बारामतीतील काही नेते खोडा घालण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण बारामतीला जात असल्याचे सांगितले.हर्षवर्धन पाटील यांना पंधरा वर्ष सत्तेत असताना सासुरवास सहन करावा लागत होता.ते आता सहन करावा लागणार नाही.मी,गिरीष महाजन, हर्षवर्धन त्रिशुळा सारखे असुन तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावु.राज्यात गेल्या पाच वर्षात सिंचनाची मोठी कामे झाली.ज्यांच्या कडे पंधरा वर्षात सिंचन खाते होते त्यांनी पंधरा वर्षात काय कामे केली.पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प केंद्राकडुत निधी आणुन मार्गी लावले.विविध सिंचन प्रकल्पासाठी वर्ल्ड बॅकेची टीम आणुन प्रकल्प मार्गी लावणार आहे,गेल्या ५ वर्षात राज्यात सर्वात जास्त गुंतवणुक झाली.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपब्ध होणार आहे.आगामी काळात राज्यात १ कोटी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असुन त्या मध्ये इंदापूर औद्यगिक वसाहती मध्ये चांगले उद्योग आणण्याचा प्रयत्न राहील.पालखी मार्गामुळे मोठ्या प्रमाणात पायभुत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
राज्यात सध्या सात लाख घरे बांधली असुन आणखी १oलाख घरे बांधण्यात येणार आहेत. तर आरोग्य योजने मुळे नव्वद टक्के लोकांना लाभ होणार आहे.तीनशे सत्तर कलम पंतप्रधान मोंदीनी रद्द केले.त्यामुळे भारताचे संविधान लागु झाले. पंधरा ऑगस्टला दिल्ली, मुंबई व जम्मु कश्मीर मध्ये एकाच वेळी तिरंगा फडकला. पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वा खाली समर्थ महाराष्ट्र साठी जनादेश व आर्शिवाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड मतदान करा. मताधिक्याने विजयी करा.असे आवाहन केले.या वेळी बोलताना महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमची लोकसभा निवडणुकच्या वेळी प्रवेश न करण्याची चुक झाली ती आम्ही सुधारली. मुख्यमंत्रच्या कुलदेवतेचा हा तालुका असुन येथुन भाजप आमदार होणार. शेतकरी केंद्रबिंदु मानुन विकास कामे करत आहे.शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. इंदापूर तालुक्यात एकही उद्योग आणला नाही. तालुक्याचा चौफेर विकासासाठी विकास आरखडा तयार आहे. आपण जातीपातीचे राजकारण करत नसुन भारतीय जनता पार्टीचे काम सबका साथ सबका विकास आहे. आम्ही माणसे जोडण्याचे
काम केले.भविष्य काळात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडु.
यावेळी बोलताना अप्पासो.जगदाळे यांनी १४ मागण्या केल्या.वत्याचे निवेदन मुख्यमंत्राना दिले.
या वेळी पाडुंरंग शिंदे,माऊली वाघमोडे, तुकाराम काळे, रामभाऊ पाटील,अशोक घोगरे, निलेश देवकर,नितीन शिंदे,संदिपान कडवळे, माऊली चौरे,मारुतराव वणवे, मुरलिधर निंबाळकर, सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पृथ्वीवराज जाचक सभापती आप्पासाहेब जगदाळे पद्माताई भोसले, नगराध्यक्ष अंकिता ताई शहा, प्रदीप मामा जगदाळे उदयसिंह पाटील राजवर्धन पाटील जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील लालासो.पवार ,बाळासो.घोलप, अविनाश घोलप,संजय निंबाळकर,विजय निंबाळकर,कालिदास देवकर,भरत शहा इ. मान्यवर उपस्थित होते.