इंदापूर:प्रतिनिधी दि.१९:-इंदापूर विधानसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसंग्राम,रयत क्रांती शेतकरी संघटना या महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथे शनिवारी(दि.19) दुपारी 2 वा. आयोजित प्रचार सभेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी तालुक्यातील सर्व मतदारांनी सांगता प्रचार सभेस उपस्थित रहावे,असे आवाहन प्रचारप्रमुख ॲड. कृष्णाजी यादव व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केले आहे.