पुणे दि०३ :- चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या वतीने पाषाण परिसरातील जेष्ठ नागरीकांना मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी सुरु केलेल्या अँप व सेल बाबत दिली माहिती तसेच फराळाच्या कार्यक्रमाचे केले आयोजन चतु श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०१/११/२०१९ रोजी ०७.०० ते ०७.३० वा. दरम्यान कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत सुसखिंड येथे पो हवा ५३९९ व्हि टी पिंगळे चतु श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी श्री वाकेश्वर ज्येष्ठ
नागरिक संघ, नवचैतन्य हास्य योग परिवार पाषाण खिंड सुसरोड येथे बैठक घेतली सदर बैठक घेऊन ज्येष्ठ नागरिकांना बैठकीत पो हवा ५३९९ व्हि टी पिंगळे चतुःश्रृगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन केले की,मा पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांचे संकल्पनेतून भरोसा सेल( COPS HUB ) सुरु करण्यात आले असून भरोसा सेलचे माध्यमातून पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी
पोलीस मदत २ महिला हेल्पलाईन ३) समुपदेशन ४) वैद्यकीय सेवा ५) विधी विषयक सेवा ६) मानसोपचार तज्ञ ७)
पिडीत महिलांचे पुनर्वसन ८ कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण भरोसा सेलमध्ये सर्वप्रकारचे सहाय्य एकाच
ठिकाणी मिळवून देण्या करिता वरील सर्व सेवा उपलब्ध आहेत भरोसा सेलमध्ये पिडीत महिलांच्या तक्रारी स्विकारण्या करिता २४x७ सुरु केली असून महिला हेल्पलाईन नंबर १०९१ चाईल्ड हेल्पलाइन नंबर १०५८, व ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर १०९० तसेच १०० नंबर वर तक्रारदारांच्या तक्रारी स्विकारुन संबंधित तज्ञांकडे पाठवण्यात येतात.ज्येष्ठ नागरिक कक्ष सामाविष्ट सेवा –
१) ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये त्यांचे तक्रारी अर्ज स्विकारुन तात्काळ दखर घेऊन त्यावर कार्यवाही केली जाते. २) ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून ज्येष्ठ नागरिक यांना आवश्यकत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात ज्येष्ठ नागरिक संघाचे/NGO चे सहकार्य घेतले जाते. ज्येष्ठ नागरिक वगैर अर्जदारांना समुपदेशन करून योग्यते मार्गदर्शन केले जाते. ४) ज्येष्ठ नागरिकांचे वॉटसअप तयार करून ज्येष्ठ नागरिकयांना मा पोलीस आयुक्तालयाकडून ओळखपत्रे ही देण्यात येतात,सायबर सेल, सेवाकार्यप्रणाली स्मार्टसिटीझन, सतर्क पुणेकर इत्यादी अँप बाबत माहीत देण्यात आली व भरोसा सेलबाबतची पत्रके यांना वाटण्यात आली. तसेच दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.