पुणे दि ०८ :- नगर – पुणे रोडवरील आपले घर सोसायटी समोरील पीएमपी बस स्टॉप जवळ व रिलायन्स मॉल जवळील चुलबुल हॉटेल जवळ,खराडी,पुणे येथे फिर्यादी सागर आव्हाळे वय-२५ वर्षे रा. वाघोली,ता.हवेली,जि.पुणे हे कामानिमीत्त चंदननगरला त्यांच्या कारमधुन क्रमांक MH12NJ 1035, दि.०६ रोजी ०४/४५ वा.ते ०५/०० वाजता. जात असताना,रिलायन्स मॉल जवळील चुलबुल हॉटेल जवळ,खराडी, ठिकाणी आले असता, अनोळखी कार मधील इसमांनी त्यांचे कारला कट मारल्याचे कारणावरुन फिर्यादी यांना अनोळखी कार चालकाने शिवीगाळ करत व त्या सोबतचे पाच इसम यांनी त्यांना मारहाण करून फिर्यादी यांचे गाडीची काच फोडुन नुकसान कली आहे व फिर्यादी व त्यांचे चुलते यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. त्यावेळी त्यांचे मध्ये झालेल्या झटापटीत त्यातील एका इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची चैनला हिसका मारुन तोडली आहे.व आरोपी त्यांच्या कार मधून पळून गेले आहे व पुढील तपास सहा.पो निरी. पाटील हे करीत आहे