पुणे दि ०८ :- येणा-या काही दिवसांमध्ये आयोध्यातील रामजन्मभुमी / बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादावर मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडून निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था देणार आहे. सदरचा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट
प्रतिक्रिया व्हॉटस्अप, फेसबुक अथवा इतर सोशल मिडीया, पत्रक बाजीत टिका-टिप्पणी करु नये.तरी सर्व नागरीकांनी (विशेषतः सोशल मिडीया वापर करणारे नागरीक व व्हॉट्स-ऑप / फेसबुक अॅडमिन वगैरे) खालील सुचनांचे पालन करावे.
१. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मिडीयावर प्रसारीत
करु नये.
२. धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी/जल्लोश करु नये, तसेच फटाके वाजवू
नयेत.
३. मिरवणुका काढू नयेत तसेच निकालासंदर्भाने अभिनंदनपर तसेच निषेध व्यक्त करणारे
फलक (बॅनर्स) लावू नयेत.
४. कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो पुन्हा
प्रसारित करुन अफवा पसरवू नयेत
४. आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो कोणी पाठविल्यास त्या पुढे फॉरवर्ड न करता ब्लॉक कराव्यात
अथवा डिलीट कराव्यात. तसेच असे मेसेज पाठविणा-यांची माहिती पुणे पोलीस तसेच
सायबर पोलीस स्टेशन ०२०-२९७ ००९७ यांना तसेच व्हॉटस्अॅप नं. ८९०७९७३१०० व
८९०४२८३१०० यांवर कळवावी.
तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक
भावना भडकवल्यास संबंधित व्यक्ती अथवा समूह यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
आपल्या सर्व हालचालींवर पूणे पोलीसांचे तसेच सायबर सेलचे लक्ष असणार आहे. आसे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ. रवींद्र शिसवे पोलीस सह आयुक्त,पुणे शहर यांनी सांगितले आहे