मावळ दि,१० : – अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उखडलेल्या लोहगड भाजे रोडची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रोडचे काम पूर्ण करावे, अशी मागणी लोहगड-विसापूर मंच व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या ऐतिहासिक
लोहगड-विसापूर ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात या ठिकाणी या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले असुन तर खडी बाहेर आल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशी घटना टाळण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाणे असणारी प्रसिद्ध भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला अशा पर्यटण स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अनेकवेळा पर्यटक चारचाकी गाडी रस्त्यावरच थांबुन वाहतुकीला मोठा खोळंबा निर्माण करत असतात.व रस्ता अंरूद असल्याने जाणार येणाऱ्या वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होते व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या रोडचं काम ताडतीने पूर्ण करावे अशी मागणी लोहगड-विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करताना रस्त्याची रुंदी वाढवावी. पर्यटकांसाठी पार्किंग व्यवस्था करता करावी अशी मागणी लोहगड-विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे,अध्यक्ष संदीप गाडे, विश्वास दौंडकर, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर यांनी केली.
सतिश सदाशिव गाडे प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे