वडगाव दि, १७ :- उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची मावळ प्रांत-अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी शिर्के राज्यमंत्री कृषी विभागावर कार्यरत होते मावळचे उपविभागीय अधिकारी मावळचे प्रांत सुभाष भांगडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची विशेष भू संपादन अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच निवृत्त झालेल्या मावळ प्रांत या जागेसाठी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना पोस्टिंग देण्यात आले आहे .यापूर्वी पुणे जिल्ह्यात त्यांनी तहसिलदार तसेच उपजिल्हाधिकारी पदावर काम केल्याने त्यांना पुण्यातील कामाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी कृषी राज्यमंत्री विभागावर काम केल्याने मावळातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांची मदत होणार आहे.
सतिश सदाशिव गाडे प्रतिनिधी वडगाव मावळ पुणे