पुणे,दि.१८ :- पुणे मगरपट्टा हडपसर,येथील एक पुरूष,रा महंमदवाडी रोड,हडपसर,पुणे याला व्हिस्की पिण्याची ईच्छा झाली व त्यांनी रात्री वाईन शॉप बंद असल्याने व्हिस्कीची होम डिलिव्हरी मागवण्या साठी गुगलवर कोणते वाईन शॉप सुरु आहे हे सर्च केले.व त्यांना मगरपट्टा हडपसर येथील सनी वाईन शॉप सुरु असल्याचे समजले. आहे का याबाबत खात्री करण्यासाठी फिर्यादी यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकावर विचारपुस
केली असता,त्याने शॉप बंद झाले असुन,आपणास होम डिलीव्हरी मिळेल असे सांगितले.त्यासाठी आपल्याला शॉप मधुन माल घेण्यासाठी आपले डेबीट कार्ड रजिस्टर करावे लागेल,त्यानंतर आपले पैसे ट्रान्सफर होतील. त्यानंतर आपले पत्त्यावर ऑर्डर पाठविण्यात येईल.फिर्यादी यांनी त्यांचे बँकेचे एटीएम कार्डावरील नंबर त्यांना सांगितल्या नंतर फिर्यादी यांचे
खात्यावरुन १,८५०/- रु सदर व्यक्तीचे व्यक्तीचे खात्यावर ट्रान्सफर झाले. त्यानंतर सदर व्यक्तीने फिर्यादी यांना होम डिलीव्हरी बॉय नसल्याचे सांगुन,आपली डीलेव्हरी होऊ शकत
नाही,आपण जमा केलेले पैसे आपले खात्यावर जमा होणेसाठी फिर्यादी यांना ओटीपी शेअर करण्यास सांगुन त्यांचे खात्यावरून ९.९०१/- रुपये पुन्हा कपात झाले. सदर इसमाने फिर्यादी
यांना तुमचा ओटीपी चुकीचा नंबर असुन,आपणाकडील पुन्हा दुसरा आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगुन,परत ९.९०१/- रुपये फिर्यादी यांचे खात्यातुन काढुन,असे एकुण 26 हजार 652 रुपये रुपयेची काहुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक झाली आहे याप्रकरणी दिव्येश जयेशकुमार पाठक(रा.महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार आयटी ऍक्ट अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.त्याने फिर्यादीच्या खात्यातून ऑन लाईन पध्दतीने 26 हजार 652 रुपये काढून घेतले. फिर्यादीला पैसे निघाल्याचा बॅंकेचे मेसेज आल्यावर त्यांनी संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला. मात्र संबंधीत क्रमांक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.