पुणे ग्रामीण दि २२ :- शिक्रापूर, तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पाबळ येथे तिनपत्ते व मटका मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या गोपनीय माहिती मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून पाबळ येथे , मीना साहेब व चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून खाजगी पिकअप मध्ये अधिकारी व जवान याना बसवुन सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे नऊ लाख तिस हजार ७३० रु रोख रक्कम चा मुद्देमाल जप्त केला आहे व 9 जणांना अटक केली आहे. याबाबत गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक, पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे ,पो.कॉ. दशरथ कोळेकर
पो.कॉ. विशाल जावळे, पो.कॉ. शर्मा पवार, तसेच, सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक शिक्रापूर पो स्टे, रानगट सहा.पोलीस निरीक्षक, पो हवा. दत्तात्रय शिंदे, यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 1,65,230= रोख रक्कम
2) 50,000= दहा मोबाईल हॅंडसेट
3)5,00,000= स्कार्पिओ गाडी तिचा नं MH 12/MF/9579
4) 1,50,000 = एक सलोरो कार नं MH/12/NP/4137
5) 50,000 = एक अल्टो कार नं MH12/FP/7354
6) 15,000 = एक इंव्होटर
7) 500 = एक लाकडी टेबल
8) 00-00 = पाच मोठे बॉक्स त्यात
60 पत्त्यांचे बंडल
————————-
9,30,730 चा माल जप्त करण्यात आला आहे.साहित्य.
असा सुमारे नऊ लाख तिस हजार ७३० – रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ९ आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास शिक्रापूर पो स्टे पो स्टे करीत आहे