पुणे दि, २२ :- पुणे शहरातून फसवणूक करुन नेलेले ट्रक मध्य प्रदेश येथे नेऊन त्या ठिकाणी विकणार्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. ट्रकचे रजिस्ट्रेशन तसेच चॅसी नंबर बदलून त्याव्दारे हे व्यवसाय करत होते. त्यांच्याकडून २ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. शब्बीर अली सय्यद (आशीर्वाद नगर, नागपूर) याला अटक केली आहे. तर साथीदाराचा शोध सुरु आहे.शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पथक गस्त घालत असताना उपनिरीक्षक नितीन शिंदे यांना माहिती मिळाली की, पुण्यातून फसवणूक करुन नेलेले ट्रकचे नंबर बदलून ते मध्यप्रदेशातील सारणी येथे वापरण्यात येत आहे.
त्यानुसार गुन्हे चे प्रतिबंध व्हावा या करता अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त गुन्हे डॉ शिवाजी पवार,व सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पोलिसांचे एक पथक सारणी येथे दाखल झाले.यानंतर सदर ट्रक नागपूर येथे मालवाहतूकीसाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथून ६० लाख किमतीचे दोन ट्रक व सय्यद याला पकडले. ट्रकच्या नंबरबाबत तपास केला. त्यावेळी असता ते फसवे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या एका ट्रकबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, दुसरा ट्रक हा टोळीतील एकाने फायनान्स कंपनीचे हप्ते चुकविण्यासाठी त्याच्या नंबरमध्ये बदल केल्याचे समोर आले आहे. सदर कामगिरीअप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त गुन्हे डॉ शिवाजी पवार,व सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सपोनि जयवंत जाधव, पोउनि नितीन शिंदे, सपोफौ अनिल ऊसुलकर, यशवंत आंब्रे, शेखर कोळी, पोहवा दिनेश गडांकुश, पोना अतुल गायकवाड, चेतन गोरे गोपाल मदने यांनी कामगिरी केली आहे