पुणे दि ०२ : – भूगाव रोड, बावधन येथे रुद्रा टायर दुकानासमोर लॉक करून पार्क केलेली इनोव्हा कार (एम एच १२ / के एन ७९७९) रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेली इनोव्हा कार चोरू नेणा-या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकाश बाबू झोरे (वय ३०, रा. गोसावी, वस्ती, रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी भूगाव रोड, बावधन येथे रुद्रा टायर दुकानासमोर लॉक करून पार्क केलेली इनोव्हा कार (एम एच १२/ के एन ७९७९) रात्री साडेसात ते दहाच्या वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली.होती व या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यामध्ये आरोपीची ओळख पटली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरी गेलेली इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख अनिरुद्ध गिझे, एम डी वरुडे, पोलीस कर्मचारी वायबसे, बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.