मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’ असं ज्या युद्धाचं वर्णन केलं जातं त्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा थरार पानिपत या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘मराठा… भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.’ असं म्हणत या ट्रेलरची सुरुवात होते आणि आपण प्रत्येक दृश्यागणिक जणू पानिपतच्या रणभूमीत हजर झालो आहोत असा आभास निर्माण केला जातो. मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेतील अभिनेता अर्जुन कपूर, अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेतील संजय दत्त, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री क्रिती सेनॉन अशा विविध पात्रांचा परिचय ट्रेलरमधून घडवण्यात येतो.
पानिपत’ च्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही कथा आहे. इसवी सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. पानिपतच्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.