पुणे दि ०३ :-पुणे कोर्टचे नॉन बेलेबल वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी लाच घेताना पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात ८ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार नीलकंठ शेजाळे (वय ४५) व पोलीस नाईक बप्पा भिकाजी गायकवाड (वय ४१) अशी लाच घेतना पकडण्यात आलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात.आला आहे शेजाळे आणि गायकवाड हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. त्यांची नेमणूक कोर्ट कामकाजासाठी आहे. ते न्यायालयाचे समन्स तसेच वॉरंट बजावण्याचे काम करतात.दरम्यान, यातील तक्रारदार यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांच्या विरोधात न्यायालयाने नॉन बेलेबल अटक वाँरट काढले आहे. त्यात अटक न करण्यासाठी व मदत गायकवाड आणि शेजाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी रात्री तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून ८ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.व शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केलेल्या याबाबत लाचलुचपत विभाग पुणे कार्यालय खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे दूरध्वनीक्रमांक०२०-२६१२२१३४ व्हाट्सअप क्रमांक :- ७८७५३३३३३३