पुणे, दि. ०९:- पुणे ग्रामीण परिसरात मांडूळाची तस्करी करणार्या इसमाला “शिरुर येथून पोलिसांनी अटक केली आहे.मा.पोलीस अधीक्षक.संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील मांडूळाची तस्करी करणार्या इसमांबाबत बातमी गोपनीय मिळाली होती व मा. पोलीस अधीक्षक. संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जैन मीना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पो. कॉ. जारवाल पो. कॉ. मांडगे पो. कॉ. पिटले, यांचे पथक तयार करून त्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते मिळालेल्या माहितीनुसार, ०८ डिसेंबर रोजी शिरूर शनी मंदिर येथे मांडूळ जातीचा साप घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली. त्या ठिकाणाची माहिती बातमीदाराच्या वर्णनाचा इसम उभा दिसला. टिमना इशारा केल्यावर टिमनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याला नाव, पत्ता विचारल्यावर त्याने शिवाजी गबाजी गुंड, राहुल अंकुश गुंड, रा. वडगाव गुंड ता. पारनेर जिल्हा अहमदनगर व महादेव खनपटे राहणार कवठे यमाई तालुका शिरूर हा एक वाहन व मांडूळ जातीचा साप अदाजे ३.५ किलो वजनाचा साप जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे व पुढील तपास पोलीस हवा. संतोष औटी करत आहे