पुणे दि ०९ :- श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस सेवा दलातर्फे कामयाणी शाळा, गोखले नगर येथील विशेष विद्यार्थ्यांना फळवाटप करून व केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक श्री. दत्ता भाऊ बहीरट,. प्रकाश पवार, किशोर बस्तेवाड उपस्थित होते व त्यांच्या हस्ते मुलांना फळवाटप करण्यात आले. तसेच ६ किलो वजनाचा केक या विशेष विद्यार्थ्यांच्या हस्ते कापण्यात आला. यावेळी कामायनी शाळेचे व्यवस्थापक श्री. कालिदास सुपाते सर, प्राचार्या सौ. सुजाता आंबे मॅडम आणि सेवादलाच्या सर्व ताई व भाई उपस्थित होते.
यावेळी पुणे शहर सेवादलाचे अध्यक्ष . प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले, किशोर बस्तेवाड आणि. बाळासाहेब शिवरकर यांनी मनोगत व्यक्त केले तर कामायनी शाळेचे. नारायण शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.