पुणे ग्रामीण दि १० :- ,बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत माळेगाव येथे तीन पत्ते जुगार मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून माळेगाव या ठिकाणी छापा मारला आसताना सुमारे ९३ हजार ८८० रु रोख रक्कम चा मुद्देमाल जप्त केला आहे व १६ जणांना अटक केली आहे. याबाबत गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे आणि बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे,
पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार,शिग्र कृती दलाचे 10 जवान तसेच,अण्णासो घोलप, पोलीस निरीक्षक बारामती तालुका पो स्टे,पो.हवा. ताकवने, बंडगर, जाधव पो.कॉ. नंदू जाधव बारामती पो स्टे यांनी केली. यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 20,480= रोख रक्कम
2) 70,000= 13मोबाईल संच,दोन लाकडी टेबल,सात खुर्च्या, पत्ते
————————-
93,880 चा माल जप्त करण्यात आला आहे.साहित्य.
असा सुमारे ९३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच १६ आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास बारामती पो स्टे करीत आहे