पुणे दि १४ :- विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्ञानप्रभोधिनी जवळ गिरीधर पारिजात सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पत्याच्या जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डावर धाड घातली. त्यात २६ जणांना अटक करण्यात आली आहे.सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी जवळ गिरीधर पारिजात या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. होती व सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री तेथे छापा घातला व जुगार खेळणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१ हजार ५८० रुपये व ९०० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.या सर्व २६ जणांना अटक केली असून जुगार अड्ड्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे.