• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या जागतिक बालकिर्तनकार महोत्सवाला सुरुवात – जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या हभप बालकिर्तनकारांची पुणेकरांना मेजवानी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/12/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, ता. २१:-  निरपेक्ष भक्ती आणि निरागस बालमन यांचा संबंध खूप जवळचा आहे. ज्याप्रमाणे लहान मुले ही देवाघरची फुले मानली जातात, त्यांचे मन निर्मळ आणि निष्पाप असते. त्याचप्रमाणे भगवंताची निर्मळ आणि निरपेक्ष मनाने भक्ती केली तर भगवंत नक्की भेटतो अशी महती आपली संत महात्म्यांची परंपरा सांगते. रोजच्या जीवनात माणूस जे काम करतो तीच भक्ती असते. त्यामुळे मनुष्याने आपले प्रत्येक कर्म लहान बालकासारखे निरपेक्ष आणि स्वच्छ हेतूने करावे, असा जीवन जगण्याचा सोपा मार्ग सांगणाऱ्या आपल्या संत महात्म्यांच्या भूमीवर आजही महापुरुषांचे विचार आचरणात आणले जातात.

संत महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला थोरा मोठ्यांपासून तरुणांपर्यंत भक्तीचा मार्ग सांगणारे अनेक कीर्तनकार लाभले. परंतु बालकिर्तनकारांच्या निरागस भक्तीची रूपे महाराष्ट्राला खूप कमी अनुभवायला मिळाली. ही कमी भरून काढण्यासाठी आणि निरागसतेतून भक्तिरसाचा संदेश देण्यासाठी शिवस्वराज प्रतिष्ठान वानवडी संस्थेचे आयोजक अमित शेलार आणि कुसुमवंदन नाट्य संस्थेचे संयोजक प्रमोद रणनवरे यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बालकिर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मा.आमदार महादेव बाबर व वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठया संख्येने हजेरी लावली.हा महोत्सव रविवार आणि सोमवार (ता. २१ ते २३) दरम्यान वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात वय वर्षे ११ ते १५ वयोगटातील बालकिर्तनकारांचा समावेश असणार आहे. या बालकिर्तनकारांच्या मेजवानीचे व्यवस्थापन संगीतरत्न हभप बाळासाहेब महाराज कुलकर्णी, हभप दीपक महाराज सुद्रिक, हभप प्रकाश खतोडे, हभप सुनीता ताई आंधळे यांनी केले आहे. यावेळी सचिन टाळके,अमर शेलार,सागर कदम,बंटी सरकार ,परमेश्वर सोलापूरे ,सचिन शितोळे,सचिन जगताप,सचिन नरके,किशोर मोरे,केतन जाधव,श्रीकांत जाधव,प्रणित निकम,प्रज्वल भानगिरे,चेतन गाडे,निलेश मोरे यांचे सहकार्य लाभले.

या नवख्या बाल किर्तनकारांच्या भव्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी (ता.२१) सकाळी अकरा वाजता शिवचरित्रकार बालकिर्तनकार हभप भैय्युजी महाराज झेंडे, दोन वाजता बालकिर्तनकार हभप स्वातीदिदि बडे, दुपारी ४ वाजता बालकिर्तनकार हभप यशवंत महाराज कातळे, तर सायंकाळी ६ वाजता बालकिर्तनकार हभप खुशालीताई उगले, आणि रात्री आठ वाजता बालकिर्तनकार हभप भक्ती महाराज चव्हाण यांच्या किर्तनांची मेजवानी रसिक भक्तांना अनुभवायला मिळाली आहे.आयोजक अमित शेलार यांच्या माध्यमातून पार पाडत आहे.

पहिल्या दिवसाच्या भक्तिमय प्रतिसादात सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.२२) सकाळी दहा वाजता बालकिर्तनकार हभप अक्षदाताई चोळके यांचे कीर्तन होणार असून दुपारी बारा वाजता बालकिर्तनकार हभप निकितादिदि भांगरे, दुपारी दोन वाजता बालकिर्तनकार शिवचारित्र्य व्याख्याते हभप घनशाम महाराज आर्वीकर, सायंकाळी चार वाजता बालकिर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज डांगे तर सायंकाळी सहा वाजता बालकिर्तनकार हभप महादेव महाराज घोडके यांच्या कीर्तनाने दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

तसेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (ता. २३) सकाळी दहा वाजता बालकिर्तनकार हभप
प्रांजलीदिदि जाधव यांच्या सुमधुर किर्तनाने सुरुवात होणार असून दुपारी बारा वाजता बालकिर्तनकार हभप चैतन्य महाराज राऊत, दुपारी दोन वाजता बालकिर्तनकार हभप गायत्रीदिदि घोडके, तर सायंकाळी चार वाजता बालकिर्तनकार हभप
अविनाश महाराज वाघ आणि सायंकाळी सहा वाजता बालकिर्तनकार हभप माईसाहेब महाराज जळगांवकर यांच्या किर्तनाने समारोप होणार आहे.भाविकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे असे आवाहन अमित शेलार यांनी केले.

Previous Post

पैशाच्या वादातून दोघा भावांना दुसऱ्या मजल्यावरुन फेकले

Next Post

साथी संस्थेमार्फत गरीब मुलांना शैक्षणिक मदत

Next Post

साथी संस्थेमार्फत गरीब मुलांना शैक्षणिक मदत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist