पुणे दि २१ :- साथी संस्थेमार्फत हॉटेल नंदादीप ताडीवाला रोड पुणे येथे शैक्षणिक मदत कार्यक्रमाचे आयोजन साथी संस्थेमार्फत करण्यात आले होते. घरून पळून आलेली, हरवलेली,भीक मागणारी, काम करणारी,चुकलेली, मुले रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून येणाऱ्या मुलांना मदत करून त्यांना सुखरूप पणे त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्वसन करण्याचं काम साथी संस्था करते. अशा मुलांमध्ये जी मुले शिक्षणामध्ये हुशार आहेत, त्यांना शिकण्याची इच्छा आहे,परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात.अशा मुलांना बोलावून शैक्षणिक मदत म्हणून क्लासेस फीस,सायकल, स्कूल युनिफॉर्म, स्कूल बॅग,वह्या,पुस्तक, टिफिन बॉक्स व इतर लागणारे शैक्षणिक साहित्य दिल जात. त्या अनुषंगाने आज दि. २१ शनिवार रोजी शैक्षणिक मदत कार्यक्रमाचे आयोजन साथी संस्थेमार्फत केले होते. व कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दिनकर टेमकर, डिप्टी डायरेक्टर (प्राथमिक) शिक्षण विभाग पुणे, संतोष वाळके, प्रोग्रॅम मॅनेजर ट्रेनिंग, उमेश मोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पुणे, सुरेश सिंग गौड, पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन पुणे, अमिताभ श्रीवास्तव बँक मॅनेजर एसबीआय ढोले पाटील रोड पुणे, साथी संस्थेचे प्रोग्राम ऑफिसर अखिल बडवाईक आणि साथी रेल्वे चाईल्ड लाईन चे शहर समन्वयक वीरेंद्र कुमार भारद्वाज तसेच साथी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.