• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे-मुंबई महामार्गावर दीड कोटींची दारू जप्त; दोघांना अटक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/12/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ :- राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार आहे.व गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. विदेशी दारूचे दोन हजार बॉक्स आणि कंटेनर असा एकूण एक कोटी ४६ लाख ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.राजेश रत्नाकरन कुरुवाट (वय 28, रा कोलमपारा, कुरिक्कावल्लापील, किझमाला, करिंडालम, जि. कासारागोड, केरळ), विजित श्रीधरन कानीकुलथ (वय 28, रा. मदाथिल, कुडोल, बिरीकुलम, पाराप्पा रोड, जि. कासारगोड, केरळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.यांच्यासह वाहनमालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंध असलेल्या इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की, गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार आहे. हा मद्यसाठा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून नेला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुसगाव पथकर वसुली नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. रविवारी पहाटे पथकर नाक्यावर १४ चाकी कंटेनर आला. पोलिसांनी या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले.
कंटेनरमध्ये असलेल्या मालाविषयी चालकाकडे माहिती विचारली. तसेच त्याची कागदपत्रे मागितली. त्यावेळी चालकाने सांगितले की, म्हापसा गोवा येथून सिरॅमिक प्लास्टिक आइटम भरले असून ते ओशिवरा मुंबई येथे चालविले आहेत. त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्कच्या दुसऱ्या पथकाने कंटेनरवरील क्लीनरला हीच माहिती विचारली असता क्लिनरने सांगितले की, मुंबई येथून सिरॅमिक प्लास्टिक आइटम भरले असून ते नांदेड येथे घेऊन जात आहोत. चालक आणि क्लीनर या दोघांच्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली.कंटेनरमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे दोन हजार बॉक्स आढळले. पोलिसांनी हा मद्यसाठा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी ४६ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून कंटेनर चालक आणि क्लीनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, संचालक उषा वर्मा यांच्या आदेशानुसार उपविभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, प्रसाद सास्तुरकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, सदाशिव जाधव, सुरेश शेगर, विशाल बस्ताव, तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक राजाराम खोत, दुय्यम निरीक्षक नरेंद्र होलमुखे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

‘धुम’स्टाईलनं सोनसाखळी चोरी करणारे सराईत चोराला पोलिसांनी केले गजाआड

Next Post

” 10 वी भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2019 बक्षीस वितरण समारंभ समारोप समारंभ.सुबोध जायसवाल, (भा.पो.से.),पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शुभहस्ते संपन्न

Next Post

" 10 वी भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2019 बक्षीस वितरण समारंभ समारोप समारंभ.सुबोध जायसवाल, (भा.पो.से.),पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शुभहस्ते संपन्न

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist