पुणे दि.:-२३ पिंपळे गुरव येथे आज पहाटे कोयत्याने वार करून पत्नीचा खून करण्यात आला. ही घटना घडली.आहे शैला हनुमंत लोखंडे वय ४० असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. व हनुमंत बाबुराव लोखंडे वय ५८, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शैला या धुणी-भांड्याचे कामे करीत होत्या. त्यांना कामावरून येण्यास नेहमीच उशीर होत असे. त्यावरून शैला आणि आरोपी हनुमंत यांच्यात नेहमी भांडण होत असे. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते.यावेळी संतापलेल्या आरोपीने शैला यांच्यावर कोयत्याने वार केले.त्यांचा आरडा ओरडा ऐकून वरच्या मजल्यावर राहणारा सावत्र मुलगा खाली आला. त्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शैला या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मुलाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपी पती याला ताब्यात घेतले. याबाबत अधिक सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे करीत आहे.