भोर दि २३ :- भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भोर महाड रोड लगत जय भवानी हॉटेल चे बाजूला शेड मध्ये पत्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी जुगार अड्डावर धाड घातली. त्यात २३ जणांना अटक करण्यात आली आहे. भोर महाड रोड लगत जय भवानी हॉटेल चे बाजूला पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व सदर ची कामगिरी ही, संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव .पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. विशाल जावळे .पो.कॉ. शर्मा पवार.पो.कॉ.नाथसाहेब जगताप, योगेश कुलकर्णी,बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच राजू मोरे, पोलीस निरीक्षक,पो.हवा. सुभाष गिरे, उद्धव गायकवाड,अनिल हिप्परकर, महिला पो.हवा. प्रमिला निकम भोर पो स्टे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा घातला व जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले.असुन त्यांच्याकडून १३ लाख १५ हजार ५६० रुपये रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.या सर्व २३ जणांना अटक केलीआहे व पुढील तपास भोर पो स्टे करीत आहे