निरा दि ०९ :- निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे दिनांक ७ रोजी वाळूतस्करांनी एका कुटुंबावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली वाळूतस्करांची पुन्हा दादागिरी वाढ झालेली दिसुन येत आहे वाळू माफियांवर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नीरा नरसिंगपूर मधील दत्तात्रय बबन कोळी वय वर्षे ४० यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरासमोरील भीमा नदीच्या पात्रात अनेक वर्षापासून वाळू तस्करी चालू आहे सोमवार दिनांक ७ रोजी पहाटे चार वाजता घराजवळ आवाज येताच बाहेर बघण्यासाठी कोळी कुटूंबीय दारात आले असता पामा मोरे यांचा स्वराज्य ट्रॅक्टर एम एच तेवीस 80 37 व त्यास वाळूने भरलेली ट्रॉली एम एच 11 आर 2385 उभा होता व त्या ठिकाणी लोक उभे होते वाळूने भरलेला ट्रॅक्टर विजेच्या खांबाला धडक दिल्याने वीज बंद झाली होती व विज का बंद केली असे त्यांना विचारले असता तिथे उभे असलेले अक्षय संजय गोडसे योगेश संजय गोडसे संजय रामदास गोडसे व इतर तीन अनोळखी लोकांनी दत्तात्रेय कोळी यांना शिवीगाळ केली व तलवार लोखंडी हत्यार यांनी मारहाण केली ते पाहता त्यांची पत्नी घराबाहेर आली असता त्यांनाही त्या लोकांनी आशील शिवीगाळ करत मारहाण केली यामध्ये त्यांच्या करंगळीला दुखापत झाली तलवारीचा मार तोंडावर केल्याने दातांना इजा पोचली सोन्याची दागिने हे त्या तंट्यात पडलेली असतात तेही मिळाली नाहीत आई 75 वर्षाची वृद्ध महिला हि त्यांनी पाहिली नाही कुटुंबातील सर्व लोकांना जबर मारहाण करून निघून जाताना धमकी देऊन घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही म्हणून शिवीगाळ केले या प्रकारामुळे कोळी कुटुंबीय मानसिक तणावाखाली घाबरत आहेत दत्ता कोळी यांच्या घडलेला प्रकार इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांना फोन द्वारे सांगितले असता तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आसुन महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यांमध्ये आणली आहे व पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहे
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार