टेंभुर्णी दि ०९ :- प्रतिनिधी माढा तालुक्यातील सापटणे (टे) येथील दहा जणांना पंधरा महिन्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले असून यात माजी सरपंच, माजी उपसभापती व कारखान्याचे संचालक यांचा समावेश आहे .सापटणे(टें) गावात मागील अनेक दिवसांपासून दोन राजकीय गटात झालेल्या हाणामाऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे घडल्याने गटातटाचे राजकारण करून शांततेचा भंग करत असल्याने
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन्ही गटातील एकूण १० लोकांना १५ महिन्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश टेंभुर्णी पोलीस ठाण्यास दिला असल्याची माहीती टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे पो.नि.राजकुमार केंद्र यांनी आज सायंकाळी पत्रकार परीषदेत माहीती दिलीविठ्ठलराव शिंदे कारखाण्याचे संचालक बाळासाहेब अण्णासाहेब ढवळे, सापटणे (टें ) चे उपसरपंच दत्तात्रेय सत्यवान ढवळे ,सापटणे चे माजी सरपंच सागर बाळासाहेब ढवळे ,सुरज बाळासाहेब ढवळे, तर त्यांच्या विरोध गटाचे माढातालुका माजी सभापती तुकाराम ढवळे आकाश अंगद ढवळे, विशाल बाजीराव ढवळे, सचिन विनायक ढवळे, पांडुरंग प्रदुम्न ढवळे, गणेश अण्णासाहेब ढवळे या दोन्ही गटातील १० लोकांना सोलापुर जिल्हा तडीपार केल्याने माढातालुक्यात पहीलीच आशी जिल्हा आधीक्षक मनोज पाटील यांनी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप