पिंपरी दि ११ :- पिंपरी येथील शाळेच्या प्रवेशव्दारावर आरोपी भेटला.व पीडित मुलीला सांगितले की मितुझ्या वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत फिरायला नेऊन एका १२ वर्षाच्या चिमुकलीवर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे व एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दि.९ पिंपरीत सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.याप्रकरणी पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डी एस पी शंकर ऊर्फ महादेव पांडूरंग सूर्यवंशी (वय २८, रा. जोतिबानगर, तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीला तिच्या पिंपरी येथील शाळेच्या प्रवेशव्दारावर आरोपी भेटला. मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, असे त्याने मुलीला सांगितले.चल तुला शंकर महादेव मंदिराकडे देहूरोडला फिरायला नेतो, असे सांगून देहूरोड जवळील एका डोंगराच्या जंगलात मुलीला घेऊन गेला. तेथे मुलीसोबत लैंगिक अत्याचार, कृत्य केले. व पुढील तपास मपोउपनि, देशमुख, करीत आहेत.