कोल्हापूर दि ११ : – इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जप्त केलेल्या दारूची चोरी झाल्याचे समोर आले आहे. कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दारू चोरांनी चोरून नेली आहे. ३१ डिसेंबरदरम्यान ही दारू जप्त करण्यात आली होती असे समजत आहे. हि दारू चोरट्यांनी चोरून नेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही अवैध दारू जप्त केली होती. जप्त केलेली दारू कार्यालयात ठेवण्यात आली होती.व कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी दारू लंपास केली आहे. जवळपास १ लाख ३ हजार रुपयांची ही दारू आहे. चोरी झालेल्या दारूमध्ये एकूण ५०८ दारूच्या बाटल्या होत्या.याची किंमत 1 लाखांहून अधिक आहे.