पुणे दि १९ : -परदेशी ऑनलाइन लॉटरी मध्ये आपल्याला लॉटरी लागली आहे व परदेशी चलनाची लॉटरी लागल्याचे सांगत सायबर चोरट्याने महिलेकडून पुणे चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महिलेकडून साडेबारा लाख रुपये उकळले आहेत. ११ जून ते १२ जुलै २०१९ कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दीपिका महाडिक (वय ३५, रा. बालेवाडी ) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका एका खासगी कंपनीत कामाला असून बालेवाडीत राहायला आहे. त्यांना एका सायबर चोरट्याने ११ जूनला खोट्या मेल – आयडीवरुन परदेशी चलनाची लॉटरी लागल्याचा मेल पाठविला. त्यानुसार दीपिकाने संबंधित मेल आयडीवर पुन्हा मेल करुन माहिती घेतली.
त्यावेळी सायबर चोरट्याने दीपिकाचा विश्वास संपादित केला. लॉटरीची रक्कम मिळविण्यासह कराच्या नावाखाली सायबर चोरट्याने दीपिकाकडून ऑनलाईनरित्या २५ हजार रुपये वर्ग करुन घेतले.त्यानंतर दीपिकाला वेगवेगळी कारणे देत सायबर चोरट्याने महिन्याभरात तब्बल १२ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. रक्कम जमा करुनही लॉटरीचे पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे दीपिकाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत