निरा नरसिंहपुर दि, १९ :- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 5 वर्षे खालील वयोगटातील मुला-मुलींना पल्स पोलिओ चा डोस पाजण्यात आला या केंद्रांमध्ये पिंपरी बुद्रुक परिसरातील सर्व माता-भगिनी आपल्या पाच वर्षे वयोगटातील मुलांना प्लस पोलिओ डोस देण्यासाठी असंख्य महिला उपस्थित होत्या अतिशय अतिदक्षता त्याची काळजी घेऊन डॉक्टर सुमित्रा कोकाटे व आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी घेऊन आलेल्या माता-भगीनीच्या मुलांना पोलिओचा डोस पाजण्यात आला यावेळी उपस्थित डॉक्टर सुमित्रा कोकाटे अंगणवाडी सेविका सीमा भांडवलकर आशाताई सारिका वाघमारे प्रियांका पाटील या उपस्थित होत्या तर या मोहिमेमध्ये इतर आलेल्या लाभार्थ्यांना देखील डोस पाजण्यात आला
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार