बारामती दि,१९ :- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळी, शेंडे वस्ती व गुणवडी या भागांमध्ये हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई ८ ठिकाणी छापे घालून १ लाख ६३हजार२०९ रुपयांचा मुद्देमाल व एकूण 22 बॅरेल कच्चे रसायन व इतर मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. व आरोपीना अटक केली.नावे शहर पोलीस स्टेशन हद्दीत1) नितीन पारधी राहणार बारामती बस स्टॅन्ड पाठीमागे सटवाजी नगर बारामती ठिकाण :- शेंडे वस्ती पाठीमागे ओढ्याच्या लगत बारामती 2) ज्ञानेश्वर पवार राहणार गुणवडी बारामती ठिकाण :- गुणवडी समाज मंदिराजवळ स्थानिक घराच्या पाठीमागे पत्राचे शेडमध्ये
3) फूलन देवी थोरात राहणार सिद्धार्थ नगर आमराई बारामती
ठिकाण :- शेंडे वस्ती पाठीमागे ओढ्याच्या लगत बारामती
4) अलका श्रीकांत पवार राहणार पिपळी बारामती
ठिकाण :- पिपळी केनल च्या इंद्रायणी नगर कडेला अलका भोसले यांच्या घराजवळ बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खालील प्रमाणे गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या भट्टीवर कारवाई करण्यात आली आहे
5) बाबाजान शेख राहणार सांगवि, बारामती ठिकाण :- सांगवी नीरा नदीचे पात्र लगत 6) पांडुरंग बाबल्या भोसले राहणार घाडगे वाडी बारामती ठिकाण :- घाडगे वाडी, शिंदे वस्ती, नीरा नदीचे पात्र लागत. 7) रोहिदास रामदास मदने राहणार घाडगे वाडी, बारामती ठिकाण :- घाडगे वाडी नीरा नदीचे पात्र लागत.8) बाळासो गुलाबराव घाडगे, राहणार घाडगे वाडी, हनुमान नगर, बारामती ठिकाण :- घाडगे वाडी शिंदे वस्ती नीरा नदीचे पात्र लागत..अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बेकायदेशीर दारू हातभट्टी (गावठी दारू) निर्मिती आणि विक्री बाबत असलेल्या तक्रारी वरून मा. श्री. जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांच्या आदेशान्वये बारामती तालुका हद्दीतील बेकादेशीर गावठी हातभट्टी तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळी, शेंडे वस्ती व गुणवडी या भागांमध्ये एकूण 1,08,100 रु, मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. त्यामध्ये एकूण 22 बॅरेल कच्चे रसायन व इतर मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घाडगेवाडी व सांगवी या भागात एकूण 55,100 रु मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. त्यामध्ये एकूण 15 बॅरेल कच्चे रसायन व इतर मुद्देमाल जागेत नष्ट करण्यात आला. अशाप्रकारे सदर कारवाई मध्ये एकूण 1,63,209 रु, चा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. व सदरची कामगिरी- मा. संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील 6 पोलिस जवान यांनी केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचे नागरिकांनाआवाहन-
अवैधरित्या चालू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध दारू विक्री बाबत माहिती देण्याचे अपर पोलीस अधीक्षक यांचे आवाहन..
मा पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील सर
यांचे मोबाईल क्रमांक 9604303333
श्री जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक, बारामती
7558221144
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती क्राईम ब्रांच
9923630652
यावर व्हाट्सअप्प करा
किंवा
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय
02112243600 येथे फोन करून माहिती देऊ शकता..