श्रीगोंदा दि, २० :- कोळगाव येथील मंडल कृषी अधिकारी डी.जी सातपुते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेतुन मिळणाऱ्या अनुदान पासुन वंचित राहावे लागत आहे. तसेच ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन न करता नियमांचा धाक दाखवत अडवणूक करित असल्याच्या कारणाने त्यांच्या विरुध्द शेतकऱ्यासह श्रीगोंदा तालुका मनसे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवार दि.२० जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेतुन मिळणाऱ्या अनुदान पासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे.सदरील अधिकारी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन न करता नियमांचा धाक दाखवून अडवणूक करित आहेत तसेच हे अधिकारी आर्थिक तडजोड करणाऱ्या शेतकऱ्यांचेच काम करतात.अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोळगाव, सुरोडी, ढोरजा, कामठी, कोथुळ, मांडवगण, चिखली या जिरायत भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या या धोरणाच्या विरोधात आज या भागातील शेतकऱ्यासह मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.या वेळी मनसे तालुकाअध्यक्ष अमोल कोहक, रा.काँ.यु.तालुका अध्यक्ष अँड.ऋषीकेश गायकवाड , संतोष वागस्ककर, संदिप वागसकर, नाथा व्यवहारे, पांडुरंग व्यवहारे, मधुकर रणसिग , त्रिबंक व्यवहारे, शिवाजी वाणी, लहुजी शिंदे, योगेश शिंदे, जालिंदर व्यवहारे, शिवराज व्यवहारे, हेमंत लोखंडे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन