पुणे ग्रामीण दि २० :- दौड आणि यवत पोलिस स्टेशन हद्दीत यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस टोल नाका, तालुक्यातील पाटस येथे येथे पाट्स दौड रोड या ठिकाणी वाळूने भरलेले ६ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.व दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वाळूने भरलेला १ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.वाळू कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळूची चोरी करून ट्रक मध्ये अवैध वाहतूक करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व मा. श्री. जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती विभाग यांनी दौंड तालुक्यातून दौंड-पाटस या रोडणे ट्रकने बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत आहे अशा प्राप्त तक्रारी वरून बारामती क्राइम ब्रांच इन्चार्ज पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस स्टाफ यांना सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर चंद्रशेखर यादव व पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी सापळा रचून यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस टोल नाका, पुणे सोलापूर महामार्ग, पाट्स दौड रोड या ठिकाणी वाळूने भरलेले ६ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वाळूने भरलेला १ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. अशा दोन्ही कारवाई मध्ये एकूण ७६ लाख,३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
७ वाहणापैकी ४ वाहनावरील चालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत-1) सचिन मोहन खरात, राहणार खोरोची तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. 2) प्रकाश गयबी कसबे, राहणार ढोकी उस्मानाबाद. 3) मारुती मुरलीधर रणसिंग, राहणार चौफुला तालुका दौंड, जिल्हा पुणे.4) गणेश कुंडलिक ठोंबरे, राहणार शिरापूर तालुका दौंड, जिल्हा पुणे.यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकणी दौंड पोलीस ठाण्यात ४ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश मा. संदीप पाटील पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा करून व ईतर अवैध धंदे सुरु आहेत. आशी गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती व अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत येथे जाऊन माहिती घेऊन अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी हे बेकायदेशीररीत्या विनापरवाना वाळूची तस्करी असताना मिळून आले व. त्यांना ताब्यात घेऊन एकूण ७६ लाख ३५ हजार रुपयचा मुद्देमाल.दौड आणि यवत पोलीस ठाण्यात ४ चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला आहे.सदरची कामगिरी-मा. संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील २० पोलिस जवान यांनी आणि यवत पोलीस स्टेशन चे भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस जवान विजय मदने, संपत खबाले यांनी केली आहे.