पुणे दि २३: –पुणे शिवाजी नगर येथील राहुल टॉकीत परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन येनार आहेत आशी गोपनीय माहिती युनिट चारच्या पोलिस निरीक्षकआंजुम बागवान यांना मिळाली होती व यांनी त्यांचे अधिनीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना वरील कारवाई च्या अनुषंगाने सूचना दिल्या दि २२ रोजी नेमणुकीस असलेले अधिकारी व कर्मचारी यांना दिली व पो, नाईक, शिर्के,व खुणवे यांना त्यांच्या बातमी मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली एक इसम शहरातील अनेक कॉलेज वर युवकांना गांजा विक्री करणा-या एका सराईत गुन्हेगाराला युनिट चारच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शौकत बाबुलाल शेख (वय ५२, रा. नेताजीवाडी, शिवाजीनगर, पुणे), असे अटक केलेल्या साईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना राहुल टॉकिजजवळ फुटपाथवर एक इसम गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा लावून आरोपी शौकत याला अटक केली. त्याच्याकडून २०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. तेलंगणा येथून त्याने हा गांजा आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. शौकत हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर गांजा विक्री व अन्य गुन्हे दाखल आहेत. युनिट चारच्या पोलिसांनी त्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त बच्चन सिंग, सहा पोलीस आयुक्त विजय चौधरी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस कर्मचारी शंकर पाटील, विषाल शिर्के, राकेश खुणवे, दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, यांनी केली आहे त्याची आणखी चौकशी सुरू असून पुढील तपास शिवजीनगर पोलीस करीत आहे.