पिंपरी-चिंचवडदि २८ : – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.होते व शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली होती व त्याबाबत पुढील कारवाई करण्यात आली होती.व
उपनिरीक्षक मिलन शंतनु कुरकुटे वय ३२ असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान सायंकाळी तक्रारदार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलेल्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यामध्ये बँकेतील अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.व एसीबीने केलेल्या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती.व सदर कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग विभाग यांनी कारवाई केली होती
व शनिवारी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.व त्यांना मंगळवारी (दि. २८) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आहे