पुणे ग्रामीण दि ३१ :- यवत पोलिस स्टेशन हद्दीत कानगाव येथे येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व श्री जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख
चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे ९३ लाख ३० हजार रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच १२ अटक करण्यात आली आहे.या प्रकणी यवत पोलीस ठाण्यात १२ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश मा. संदीप पाटील पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा व ईतर अवैध धंदे सुरु आहेत. आशी गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती व अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची तस्करी करत आहेत
व यवत पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस जवान तसेच महसूलचे अधिकारी यांच्यासह अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी भीमा नदी पात्रात आरोपी हे वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही लिलाव करण्यात आला नसताना बेकायदेशीर पणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून JCB आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने ट्रॅक्टर्स आणि ट्रक मध्ये भरून चोरी करत असताना मिळून आले. सदर ठिकाणी खलील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला..
1) 24,00,000/- चार फायबर लोखंडी बोटी प्रत्येकी किंमत सहा लाख असे एकूण 2) 8,00,000 /- चार लहान बोटी प्रत्येकी किंमत दोन लाख रुपये असे एकूण 3) 16,00,000 /- दोन ट्रक वाळू वाहतूक करणारे 4) 30,00,000/- दोन जेसीबी प्रत्येकी 15 लाख रुपये 5) 15,00,000/- 3 ट्रॅक्टर ट्रॉली सह ह् प्रत्येकी किंमत पाच लाख रुपये 6) 30,000/- 10 ब्रास वाळू 93,30,000 रु.. एकूण मुद्देमाल एकूण 12 आरोपींविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
पोलीस उपनिरीक्षक श्री पदमराज गंपले, बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 6 पुरुष 5 महिला पोलीस जवान यांनी तसेच-यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील, पाटस चौकीचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक सचिन घाडगे, पोलीस जवान विजय भापकर, सुधीर काळे, संपत खबाले दौड पो स्टे चे सपोनि श्री अजय अधिकारी, संतोष मदने यांनी केली. तहसीलदार श्री सचिन पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ महसूल पथकाचे मंडल अधिकारी श्री संदीप जाधव, तलाठी श्री बालाजी जाधव, श्री संकपाळ यांना कारवाई साठी पाठविले. सदर जप्त बोटी नाश करणेकामी महसूल पथकाचे ताब्यात दिल्या असून नाश करण्याबाबत कारवाई सुरू आहे..