श्रीगोंदा दि ०६ :- प्रतिनिधी :-श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणा वरून सख्या भावास जिवंत जाळण्याची घटना घडली श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विरोधात दत्तात्रय खोरे यांच्या सह तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पांडुरंग अंकुश खोरे वय ३२ याने २८ जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्याचा
सख्खा भाऊ दत्तात्रय अंकुश खोरे याच्या विरूध्द भा.दं.वि कलम ३०७ प्रमाणे फिर्याद दिली याचा राग येऊन दत्तात्रय खोरे याने अनिल महादेव मगर(गार,ता.श्रीगोंदा) आणि एक अनोळखी इसम यांना सोबत घेऊन पांडुरंग खोरे याला मारहाण करीत बळजबरीने रॉकेल पाजले. तसेच अंगावर ओतले. पांडुरंग रॉकेलने पुर्ण भिजल्यानंतर अश्लील शिव्या देत, दत्तात्रयने स्वतःच्या भावाला पेटवुन दिले. यामध्ये पांडुरंग हा गंभीररित्या भाजला असून, त्याला जिल्हा शासकीय रूग्णालय, अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पांडुरंग खोरे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय खोरे यांच्यासह तिघां विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. राजेंद्र सानप करीत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन