महाराष्ट्र पोलिसांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, निवृत्त पोलिसाची मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला जात असेल तर तोच न्याय पोलिसांनाही लागू करावा, अशी विनंती स्वेच्छानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी डॉ. कृष्णदेव गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
डॉ. गिरी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच एक निवेदन दिले. पोलीस हेसुद्धा राज्य सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात जितके शनिवार येतात तेवढय़ा दिवसांचा जादा पगार पोलिसांना त्यांच्या त्या महिन्याच्या पगारात देण्यात यावा असेही गिरी यांनी निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच कार्यरत पोलीस आणि निवृत्त पोलीस यांना अनेक प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यावरही कायमस्वरूपी उपाययोजना करावी असेही त्यांनी नमूद केले आहे.