पुणे दि ०८ :- रांजणगाव येथे दि ०५ रोजी रांजणगाव ता . शिरूर जि . पुणे येथे युवासेना पुणे जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांचे अभिष्टचिंतनाचे निमीत्ताने आयोजित कार्यक्रमास एक प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्रीस निमंत्रीत करणेत आले होते व कार्यक्रमा दरम्याण सिस्टीममध्ये काही तरी अडचन निर्माण झाली होती व त्यामुळे स्टेजचे पाठिमागे मराठी सिनेअभिनेत्री यांचे सोबत बोलण्या करीता आयोजक डॉ . संतोष पोटे व त्यांचा एक साथीदार डी . जे . सिस्टीम कामगार असे दोघे आले होते . दरम्याण आयोजक डॉ . संतोष पोटे यांचे सोबत आलेल्या इसमाने अचानक प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री सोबत गैर वर्तन करून त्यांचा विनयभंग केला व मराठी सिनेअभिनेत्री यांनी आयोजक डॉ . संतोष पोटे याला विचारना करीत असताना डॉ . पोटे मराठी सिनेअभिनेत्री यांचे इतक्या जवळ उभे राहिले की , त्यामुळे देखील मराठी सिनेअभिनेत्री यांचे मनास लज्जा उत्पन्न झाली . दरम्याण डॉ . संतोष पोटे यानी मराठी सिनेअभिनेत्री यांचेशी वाद घातला व कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक डॉ . संतोष पोटे यांच्या पत्नी डॉ . सुनिता पोटे यांनी मराठी सिनेअभिनेत्री यांना फोन करून दमदाटी केली होती व या प्रकारा बाबत मराठी सिनेअभिनेत्री यांनी साकीनाका पोलीस स्टेशन मुंबई येथे काल ता . ०७ रोजी तक्रार दाखल केली व ती तक्रार काल ता ०७ रोजी रात्री रांजणगाव एम . आय . डी . सी . पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली . तक्रार दाखल होताच मा . संदिप पाटील सो . पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा . जयंत मिना साो . अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग , मा . श्रीमती ऐश्वर्या शर्मा सो . उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेले सुचना व मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहा . पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम , पोलीस नाईक अजित भुजबळ , मंगेश थिगळे , किशोर तेलंग , प्रफुल्ल भगत , पोलीस कॉन्स्टेबल मिलींद देवरे , अमोल नलगे यांचे पथक तयार करून सदर पथकाने यातील आरोपींचा शोध घेत प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री यांचा विनयभंग करणारा डि . जे . कामगार नामे अजय अशोक कल्याणकर वय २३ वर्षे रा . पर्वतीदर्शन ता . हवेली जि . पुणे याचा स्वारगेट पुणे परीसरात शोध घेवून त्याला आज पहाटे ०३ वा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले व आरोपीला अटक केली आहे गुन्हयाचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनच्या शुभांगी कुटे महिला पोलीस उपनिरीक्षक या करीत आहेत .