निरा नरसिंहपुर दि१९ :- इंदापूर राजमुद्रा प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ शिवभक्त पिंपरी बुद्रुक यांच्या सौजन्याने लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संस्कृतिक महोत्सव आयोजन केला असल्याने पिंपरी आणि परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी म्हणजे पहिली ते चौथी ,पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी ,अशा तीन गटांमध्ये विभागून स्पर्धा घेण्यात व वैयक्तिक डान्स व ग्रुप डान्स याकरता ही आकर्षित बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेऊन राहणार असल्याचेही प्रतिष्ठानच्या वतीने सांगितले आहे सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पिंपरी परिसरातील ग्रामस्थ व राजमुद्रा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन केले आहे सायंकाळी 6 वाजता शिव संस्कृतिक महोत्सवानिमित्त व शिवचरित्रावर व्याख्यान प्रिया गायकवाड बारामती यांचे झाले आहे सायंकाळी मिरवणुकीचा खर्च गुलाल डीजे पूर्ण खर्च वगळून शिवजयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन शरद बोडके व राजमुद्रा ग्रुप पिंपरी बुद्रुक यांच्यावतीने करण्यात आले आहे तरी याचा सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिनांक 20 रोजी स्पर्धेमध्ये विजय झालेल्या वैयक्तिक डान्स स्पर्धेमध्ये विजय झालेल्या विद्यार्थ्यांना राजमुद्रा प्रतिष्ठान व पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार