आरवली दि १९ :- प्रतीनीधी : – चिपळूण तालुक्यातील येगांव जि.प शाळा क्र.१ मधील शाळेच्या बांधकाम निधी गैरव्यवहार प्रकरणी येगांव ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जाधव यांनी २६ जानेवारी २०२० रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते या उपोषणादरम्यान संबंधित प्रकरणी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभाग ( उत्तर रत्नागिरी ) कार्यकारी अभियंता यांनी दिले होते मात्र अद्याप काहीच कार्यवाही होताना दिसत नसून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रमुख समन्वयक रविंद्र वायकर यांची भेट घेवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भुमिका घेतली असताना चिपळूण पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे यांनी १७ फेब्रुवारी रोजी येगांव जिल्हा परिषद शाळेला भेट देत बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी माहीती घेतली यावेळी सभापती धनश्री शिंदे यांनी येगांव सरपंच अनविता चव्हाण यांच्यासोबत चर्चा करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.येगांव जिल्हा परिषद शाळा आदर्श बनवण्यासाठी ग्रामस्थांनी ४ लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती तर जिल्हा परिषद ने २०१५ – १६ या आर्थिक वर्षात शाळा दुरुस्ती कामासाठी जि.प ४ टक्के सादील फंडातून ८ लाख ३६ हजार रुपये मंजुर केले होते जिल्हा परीषदेच्या ४ टक्के सादील फंडातून मंजुर केलेल्या या निधीची निविदा येगांव ग्रामपंचायतीने केली होती मंजुर कामाचा कार्यारंभ आदेश ग्रामपंचायतीने दिल्यानंतर सादील फंडातून मंजुर झालेला निधी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला वर्ग करणे आवश्यक होते ग्रामपंचायतीला विचारात न घेताच पर्यायाने काम न करताच सर्व पैसे गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने ठेकेदाराने काढले कार्यारंभ आदेश देणारी संस्था ग्रामपंचायत असताना पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी परस्पर ठेकेदाराला पैसे दिल्याने गटविकास अधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंत्यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सादील फंडातून मंजुर केलेल्या निधीची खिरापत ठेकेदाराला परस्पर वाटली गेल्याने स्थानिक ग्रामस्थांनी जमा केलेल्या लोकवर्गणीतून शाळेचे शुशोभीकरणाचे काम करण्याचा प्रयत्न केला, येगांव शाळेच्या कामाचा निधी गेला कुठे ? असा प्रश्न स्थानिकांना पडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होवून २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन सर्व रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.चिपळूण पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे यांनी येगांव जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी सरीता पवार, येगांव सरपंच अनविता चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, शाखा अभियंता अ.न यादव, एस.पी माळी, विकास चव्हाण, प्रकाश चव्हाण, विकास विनायक चव्हाण, ग्रामसंघ अध्यक्षा सुप्रिया चव्हाण, प्रणाली चव्हाण आदी उपस्थित होते.
रत्नागिरी प्रतिनिधी ;- संतोष येडगे