पुणे २१ : – अत्यंत वर्दळीच्या रांजणगाव येथे हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवामध्ये पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या ५ परप्रांतिय वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल व पुणे रांजणगाव शहरामध्ये हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा याठिकाणी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी परप्रांतीय महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहेत आणि त्यामधून अर्थार्जन करून स्वतःची उपजीविका चालवत आहेत अशी माहिती जयंत मीना सो. (आय पी एस) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरात जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भारतकुमार राऊत आणि जवान यांच्यासह अचानक हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मुक्ताई येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व हॉटेल गारवा येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळून आले. सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या सात इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर 5 महिलांची सुटका केली त्यांना महिला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.आरोपी 1) महेश उर्फ बापुण, रा रांजणगाव 2) सुमित साहू, रा रांजणगाव 3) संदीप बळवंत येंधे, राहणार- जुन्नर जिल्हा पुणे 4) राजू पित्तवास साहू, राहणार- ओडिसा
5) संतोष लोकनाथ बेहरा, राहणार- ओडिसा 6) नारायण संजय दुधाटे, राहणार- परभणी 7) राकेश उर्फ लूफताद रहमान शेख असे एकूण 7 आरोपींविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशन ला अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
रांजणगाव पो स्टे चे पोलीस निरीक्षक भारतकुमार राऊत,एपीआय प्रफुल्ल कदम..बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 9 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान यांनी तसेच-रांजणगाव पो स्टे चे पोलिस जवान किशोर तेलंग, अजित भुजबळ, रघुनाथ हळनोर , यांनी कारवाई केली..