नीरा नरसिंहपूर :दि.२३ :- शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन युवकांनी यशस्वी जीवन घडवावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.सराफवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 20) पूजन करण्यात आले.सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. शिवाजी महाराजांनी राबविलेल्या धोरणांमुळेच आजही समाजिक एकोपा आपणास दिसत आहे.रयतेसाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.या कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच कबड्डी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राजकुमार जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभान शेख यांची भाषणे झाली.यावेळी मिरवणुकीचा शुभारंभ जि.प. सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मिरवणुकीमध्ये गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.तसेच हर्षवर्धन पाटील हेही सहभागी झालेले होते.या शिवजयंती उत्सवाचे आयोजन राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सुभान शेख, उपाध्यक्ष धीरज शिंदे, खजिनदार दत्तात्रय जाधव, संदीप धनवडे, महेश जाधव, समाधान सूर्यवंशी, प्रणव भापकर, आप्पा भापकर, गोविंद शिंदे, विशाल शिंदे, सौरभ जाधव व सर्व कार्यकर्त्यांनी केले. सूत्रसंचालन कांतीलाल आव्हाड व आभार शितल बळे यांनी मानले.
इंदापूर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार