नीरा नरसिंहपूर दि.२३ :- रेडा ( ता. इंदापूर ) येथील संत गुलाबबाबा यात्रा सोहळा ( दि.२० ) रोजी पासून सुरुवात झाली होती. संत गुलाबबाबा यात्रा काशिविश्वेश्वर यात्रा अशा भव्य संत गुलाबबाबा फेस्टिवल तीन दिवस कार्यक्रम चालू होता. ( दि .२० ) ला सर्व ग्रामदेवतेची महापूजा करण्यात आली .सर्जनाथ, भैरवनाथ, श्री काशिविश्वेश्वर, महालक्ष्मी , श्री बजरंग बली हनुमान, पिरसाहेब , महादेव मंदिर , वेताळ साहेब सर्व ग्रामदेवतेची निमून दिलेल्या ग्रामस्थांनी महापूजा केली. दुसऱ्या दिवशी दुपारी भजनाचा कार्यक्रम , रात्री मिरवणूकाचा भव्य कार्यक्रम झाला आणि तिसऱ्या दिवशी ( दि.२२ )ला काल्याचे किर्तन व महाप्रसाद , रात्री ९ वा. तमाशाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या यात्रेची सांगता काल्याच्या किर्तनांनी झाली. ह.भ.प डाँ. किरण महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनांला तीन साडेतीन हजार भक्तांनी उपस्थित लावली होती. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय देखणी सुंदर नियोजन, आयोजन संत गुलाबबाबा संस्थान , यात्रा कमिटीनी केलं होत.
कमीत कमी तीन ते साडेतीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . सकाळी १० वा. कीर्तनांला सुरुवात होऊन साडेअकराच्या दरम्यान किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. संध्याकाळी ३ वाजेपर्यंत महाप्रसाद चालू होता. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . या यात्रेस माजी सैनिक, इंदापूर पंचायत समितीचे सभापती महेंद्र दादा रेडके, युवा उद्योजक , सोन्या-चांदीचे व्यापारी , प्रगतशील बागायतदार, भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे , चित्रपट अभिनेते शिवकुमार गुणवरे , सामाजिक कार्यकर्त्या हिराताई पवार अनेक मान्यवरांनी मंदिरास भेट दिल्या.
इंदापूर तालुक्यातील अनेक पत्रकार , संपादक , टीव्ही रिपोर्टर , यांचाही संत गुलाबबाबा संस्थानच्यावतीने गुलाबबाबा फेस्टिवल म्हणून हार , फेटे बाधून श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले . ७० ते ८० पत्रकारांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होते . रेडा गावचे तलाठी तांबिले भाऊसाहेब , ग्रामसेवक गणेश जाधव , अनेक कला , क्रीडा नाट्य, साहित्य , राजकीय-सामाजिक , कुस्ती , कृषी , कर्तव्यदक्ष अधिकारी , मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .अनेक मान्यवरांनी मंदिरास भेटी दिल्या .बाहेरगांवची भजनी मंडळ , भक्तांचे स्वागत करण्यात आले व मानाचा नारळ देण्यात आला. भारतातील अनेक राज्यांतून आलेल्या सर्व भक्तांचे संस्थेच्यावतीने , यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातील मौजे .गुलाबनगर ( रेडा ) येथील तानाजी कृष्णा जगदाळे यांनी महाप्रसाद दिला होता त्यांचाही संत गुलाबबाबा संस्थांच्या वतीने, यात्रा कमिटीनी सत्कार करण्यात आला.सात दिवस मंदीरात सेवा देण्याय्रा मानकरी सेवेकरी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. अक्षय मोहिते मंडप डेकोरेशन कॉन्ट्रॅक्टदार व डीजे गुलाबनगर (रेडा) तीन दिवस संत गुलाबबाबा फेस्टिवल यात्रे निमित्त मंडपची सुंदर व्यवस्था केल्याबद्दल अक्षय मोहिते , कुंडलिक मोहिते पिता-पुत्रांच्याही सन्मान संत गुलाबबाबा संस्थांचे अध्यक्ष अँड. तानाजीराव बाबुराव देवकर , सचिव तुकाराम जगदाळे, सरपंच तुकाराम देवकर सर्व विश्वस्त मंडळ नानासाहेब देवकर धनंजय गायकवाड , प्रा. आत्माराम देवकर राजेंद्र आडसूळ, रामचंद्र मोहिते , उत्तम पवार , हनुमंत अंकुश देवकर , ॲड. योगेश देवकर, विकास विलास देवकर , रोहिदास भोसले , सुनील मोहिते सोमनाथ देवकर , संतोष देवकर , तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ देवकर ,उमेश पाटील सतीश विलास देवकर , सचिन जगदाळे , अक्षय देवकर , नवनाथ पांडुरंग देवकर , विजय देवकर , विजय प्रभाकर देवकर , धीरज देवकर , जालिंदर देवकर दिलीप देवकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य , रेडा विविध कार्यकारीचे चेअरमन सर्व सदस्य, यात्रा कमिटी सदस्यांनी मान्यवरांचे सत्कार केला . अतिशय कार्यक्रमाचे देखणं नियोजन केलं . संत गुलाबबाबा यात्रेस विशेष करून महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती . तीन दिवसापासून छबिना , मिरवणूक ,भजन-कीर्तन , नाटक , तमाशा , अशे अनेक कार्यक्रम तीन दिवस चालू होते. या कार्यक्रमाचा शेवट रात्री ठिक १० वा. ईश्वर बापु पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होऊन यात्रा उत्सवाची सांगता झाली. गुलाबनगर ( रेडा ) परिसर खेळण्याच्या दुकानांनी, हॉटेल, पाळणे, अनेक अशा गोष्टीमुळे सर्व परिसर गजबजून गेला होता. भंजनी मंडळ असतीलं , वाहनचालक असतील , पाण्याचे टाकीवाले असतील , अशा सर्व लोकांचाही संत गुलाबबाबा संस्थानच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संत गुलाबबाबा मंदिराचा महाप्रसादाचा स्वयंपाक व कुठलाही भंडाऱ्याचा स्वयंपाक मोफत मध्ये करणारे गुलाबनगर (रेडा) येथील आचारी सुभाष मांढरे व त्यांची सर्व टीम शहाजी देवकर , ज्ञानदेव गोळे , बाळासाहेब कुंभार , तुकाराम कुंभार यांचा ही स्वागत करण्यात आले. गेले आठ दिवस काही महिला स्वच्छतेचं काम करतात त्यांचाही सत्कार करण्यात आला. शाकुबाई मोहिते , पद्मिनी गायकवाड व आलेल्या हजारो भक्तांना प्रसाद वाटण्याचे काम गुलाबनगर (रेडा ) गावातील सर्व युवक मंडळ यांनी केलं. राजकीय-सामाजिक सर्व संघटनेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , कार्यकर्ते प्रसाद वाटण्याचं काम केल्याबद्दल संत गुलाबबाबा संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि संत गुलाबबाबा यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात झाली.
इंदापूर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार