पुणे दि २३ :- पुणे शहरातून अनैतिक मानवी व्यापारात अडकलेल्या २ पिडीत मुलींची पुणे पोलिसांनी केली सुटका दि २२ रोजी मा . पोलीस उपआयुक्त सो गुन्हे शाखा पुणे शहर यांचे आदेशान्वये पश्चिम बंगाल येथील दाखल पीटा अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्हयामधील पाहिजे असलेले आरोपी व मिसिंग मधील हरविलेल्या महिलांचा शोध घेत असताना सहा . पोलीस आयुक्त शिवाजी पवार सहा . पोलीस आयुक्त प्रतिबंधक कक्ष , गुन्हे शाखा पुणे शहर विजय चौधरी अभियोग गुन्हे शाखा पुणे शहर यांचेसह त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभागाकडून गुन्हे शाखेकडील ३ पोलीस निरीक्षक , व स्टाफ यांचेसह फरासखाना पोलीस ठाणे हद्दीत नवीन सागर बिल्डींग , जुनी सागर बिल्डींग , नवीन बिल्डींग याठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील दाखल पीटा अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्हयामधील ३ पाहिजे असलेले महिला आरोपी मिळून आल्याने त्यांना पुढील कारवाई कामी पश्चिम बंगाल पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे . तसेच जुनी सागर बिल्डींग या ठिकाणी कारवाई दरम्यान मा . सहा . पोलीस आयुक्त शिवाजी पवार सहा . पोलीस आयुक्त प्रतिबंधक कक्ष , गुन्हे शाखा पुणे शहर यांचे सह त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे , पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके सामाजिक सुरक्षा विभाग तसेच सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखा येथील स्टाफ यांनी केलेल्या कारवाई मध्ये १ पुरुष व २ महिला आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पिटा ॲक्ट कलम ३ , ४ , ५ , ६ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कारवाई दरम्यान दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे . वरील नमुद कारवाई . अशोक मोराळे , अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे , बच्चनसिंग पो . उप . आयुक्त गुन्हे , यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन कारवाई मध्ये दोन सहा . पोलीस आयुक्त , ४ पोलीस निरीक्षक , २ पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे शाखेकडील स्टाफ सहभागी झाले होते .