श्रीगोंदा दि २४ :- श्रीगोंदा तालुक्यातून रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे लोणी ते बेलवंडी या हद्दीतील कामासाठी तालुक्यातील बेलवंडी, घारगाव, पारगाव फाटा, बेलवंडी फाटा येथील खाजगी शेतकऱ्यांच्या शेतातून रॉयल्टी पेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन सुरू असून या कडे महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम श्रीगोंदा तालुक्यात चालू असून या दुहेरी मार्गासाठी वापरण्यात येणारा मुरूम हा तालुक्यातील बेलवंडी, घारगाव, पारगाव फाटा, बेलवंडी फाटा येथील खाजगी शेतकऱ्यांच्या नावावरील जमिनीवरून करण्यात येत असून या मुरुमाची संबंधित ठेकेदाराने महासूल विभागाकडे भरलेल्या रॉयल्टीपेक्षा मुरुमाचे उत्खनन सुरू असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तालुक्यात उत्खनन सुरू झालेल्या दिवसापासून कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा स्पॉट व्हिजिट केली नसल्याची एक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
संबधित ठेकेदाराने वनविभागाच्या हद्दी शेजारील जमिनीतून उत्खनन केलेल्या मुरूमाची वाहतूक राजरोस पणे वनविभागातील रस्त्यावरून वनविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता केलेली दिसून येते.
महसूल विभाग व वनविभाग यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सरकारी मालमत्तेचा वाली कोण? हा प्रश्न निर्माण होत आहे.चौकट :
या बाबत तहसिलदार महेंद्र माळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की संबधित ठेकेदाराने आज पर्यंत ४ कोटी रुपये पेक्षा रॉयल्टी भरलेली असून संबंधित जागेवर आमचे कर्मचारी पाठवून चौकशी करतो जर त्यांनी रॉयल्टी पेक्षा जास्त मुरूम उचलला असेल तर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन