पुणे दि २४ : – पुणे वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातल्या महिला संगणक ऑपरेटरसह सेवानिवृत्त कोतवालाला जुने सात-बारा देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पुनम विष्णू जानवळे (वय 30, रा. वडगाव शेरी) आणि विकास शंकर जोशी (वय 60) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुनम ही वडगाव शेरी येथील तलाठी कार्यालयात संगणक अॅपरेटर आहेत. तर, विकास जोशी हे सेवानिवृत्त कोतवाल आहेत. सध्या ते तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करत होते. दरम्यान, यातील तक्रारदार यांना जुना सात-बारा घ्यायचा होता. त्यासाठी ते तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी विकास जोशी याने त्यांच्याकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी पुनम जानवळे यांना तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई मा . पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री . राजेश बनसोडे व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याबाबतचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १ . हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २ . ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३ . व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४ . व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००