पुणे दि २४ : – महावितरण प्राधिकरण उप – विभाग – निगडी , पुणे , येथील मीटर रिडींग घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमणुक केलेल्या आरोपी यांनी १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.शांताराम पोपट सोनवणे , वय – ३३ वर्षे , मीटर रिडर ( मीटर रिडींग घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमणुक केलेला ) महावितरण प्राधिकरण , उप – विभाग , निगडी , पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
महावितरण प्राधिकरण , उप – विभाग , निगडी पुणे आहेत. तर,
दरम्यान, यातील तक्रारदार यांना तक्रारदार यांचे वापराच्या मीटरला व्यावसायिक दराने दंड न लावण्यासाठी तसेच घरगुती वापराच्या मीटरला व्यावसायिक दराने आकारणी न करणेसाठी २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी शांताराम पोपट सोनवणे यांना तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाच स्विकारले प्रकरणी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे .कलम भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम – ७ अ आरोपीचे नाव व मागणी केलेली लाचेची रक्कम | २५, ०००/ स्विकारलेली लाचेची रक्कम | १५ ,०००/ थोडक्यात माहिती .पडताळणी दि : – २४ / ०२ / २०२० सापळा दिनांक : – २४ / ०२ / २०२० आरोपी याने १ ५, ००० / – रूपये लाचेची मागणी करून आरोपीला लाच रक्कम स्वीकारल्यावर रंगेहात पकडण्यात आले . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व मा . अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे . १ . हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २ . ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३ . व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४ . व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००